Mumbai : रेल्वे रूळ ओलांडताना कानात एअरफोन, ट्रेननं उडवले, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Mumbai News : मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला आहे. कानातील एअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या लागलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना माकने गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. माकणी गावातील वैष्णवी रावल (१६) हीने कानात एअरफोन घातल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत विद्यार्थीचा मृत्यू झाला. ती इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Mumbai Crime : मुंबई हादरली, रिक्षाचालकाचा २० वर्षीय तरूणीवर बलात्कार, गुप्तांगात ब्लेड अन् दगड आढळले

पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटका जवळ पादचारी पुल नसल्याने विद्यार्थीनीचा जीव गेला. यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या-जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा यासाठी माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळताच रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात माकणे ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थी यांच्याकडे हमखास मोबाईल असतात, त्यामुळे गाणी ऐकण्यासाठी हे एअरफोन घालून दररोज प्रवास दररोज सुरू असतो. त्यावेळी एखाद्या गाण्यांमध्ये हे मग्न असतात व त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना येणाऱ्या रेल्वे गाडीचा व वाहनांचा त्यांना आवाज येत नाही व हकनाक ते आपला जीव गमावून बसतात. तरुण वर्गात असणारे हे वेड जीवावर बेतते. यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन आवश्यक झाले आहे, स्वयंसेवी संघटना, पोलीस विभाग यांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृकता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply