Mumbai : शीव कोळीवाडा, जीटीबीनगरमधील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक-आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून येत्या काही दिवसांतच निविदा अंतिम करण्यात येणार होती. मात्र आता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. म्हाडाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेणारी एका खासगी विकासकाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच म्हाडाला या पुनर्विकासासंबंधी कोणतीही पुढील कार्यवाही न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार निविदेची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा रखडलेला पुनर्विकास राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. या पुनर्विकासाची जबाबदारी आपल्याकडे आल्यानंतर मंडळाने मोतीलालनगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची नियुक्ती करून (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) पुनर्विकास मार्गी लावण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या मार्चमधील बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. एकूणच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने मुंबई मंडळाने पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला.
|
त्यानुसार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ही निविदा प्रक्रिया सुरू असतानाच एका खासगी विकासकाने या पुनर्विकासावर, निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने एप्रिलमध्ये निविदेला स्थगिती दिली. मात्र नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळून लावत म्हाडाला दिलासा दिला.
उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मंडळाने तात्काळ निविदा प्रक्रियेस सुरुवात करून गेल्या आठवड्यात पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्या. रुणवाल डेव्हलपर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या दोन कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या. या निविदांची छाननी करून मंडळाने नुकतीच आर्थिक निविदाही खुली केली असून येत्या काही दिवसांतच निविदेला अंतिम स्वरूप दिले जाणार होते. मात्र निविदा प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. संबंधित विकासकाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होईल.
शहर
- Mumbai GBS : मुंबईत GBSने घेतला पहिला बळी, नायर रुग्णालयात उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Pune : धक्कादायक! मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये सुरू होता गॅस भरणा, पुणे पोलिसांनी केला रॅकेटचा भांडाफोड
- Pune : महिलांची छेड काढाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा भाईंना सज्जड दम
- Pune Metro : अरे वा! पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना ई- बाईकची सुविधा, १० मेट्रो स्थानकांवर मिळेल बाईकची सेवा
महाराष्ट्र
- Valentine : व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून बेदम चोपलं, तरूणाचा मृत्यू
- Mumbai GBS : मुंबईत GBSने घेतला पहिला बळी, नायर रुग्णालयात उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Pune : महिलांची छेड काढाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा भाईंना सज्जड दम
- Pune Metro : अरे वा! पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना ई- बाईकची सुविधा, १० मेट्रो स्थानकांवर मिळेल बाईकची सेवा
गुन्हा
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
- Pune Crime : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
![YouTube player](https://i.ytimg.com/vi/KlPfU6nIV38/maxresdefault.jpg)
![loading](https://punenews24.in/wp-content/plugins/youtube-embed-plus/images/gallery-page-loader.gif)
![play](https://punenews24.in/wp-content/plugins/youtube-embed-plus/images/playhover.png)

देश विदेश
- Crime News : चोरीपूर्वी देवापुढं केला नवस, हाती घबाड लागताच १ लाख केले दान अन् भंडाराही घातला
- Congress : काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा भोपळा, राजधानीतलं काँग्रेसचं गणित चुकतंय कुठं?
- Bangladesh Clashes : भाषण सुरू होण्याआधी बांगलादेशात वडिलांचं स्मारक जाळलं; संतापलेल्या शेख हसीना यांनी भारतातून दिला इशारा
- Patna News : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या १८ वर्षीय मुलाची आत्महत्या, नेमकं कारण काय?