Raj Thackeray News :...तर मशिदीचे भोंगे बंद करु; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Mumbai  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी मुंबईच्या घाटकोपरमधून पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे बंद करू, असा इशारा दिला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर मशिदीचे भोंगे बंद करु, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांची मनसे उमेदवारांसाठी घाटकोपरमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

मी सभांमध्ये नवीन काय बोलणार. मी उद्या गुहागरला ‌जाणार आहे. महाराष्ट्रात विषयांची काही कमतरता नाही. शहराचा अख्खा विचका ‌झाला आहे.

मला इथं यायला दीड तास लागला आहे. शहरात किती माणसे येत आहे. रस्ते कमी पडत आहेत. मनसेनं केलेल्या कामांचं पुस्तक आहे. कुठल्या पक्षाची हिंमत‌ नाही, त्यांच्या कामांचं पुस्तक काढण्याची.

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रैकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

पत्रकार मला कुत्सितपणे ब्लू प्रिंटचं काय झालं ते विचारायचे, पण ब्लू प्रिंट आणली. तेव्हा कोणी विचारली नाही. कारण कोणी वाचलीच‌ नाही. आंदोलनामुळं टोलनाके बंद झाले. ते पैशांचं मशीन होतं. त्याबद्दल आम्हाला श्रेय दिलं जात ना.

सत्तेत नसताना आंदोलनं केली. मराठी पाट्यांचं आंदोलन तसंच‌ होतं. दुकानावरच्या पाट्या मराठी झाल्या. मोबाईल फोनवर मराठी यायला लागलं.

पुढे भोंगे बंद करण्यासाठी आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ते त्रांगडं सरकार होतं. तीन प्राण्यांचं लग्न झालं होतं. तेव्हा १७ हजार मनसैनिकांवर केस टाकल्या.

भोंग्यासाठी सरकारनं साथ दिली असती, तर भोंगे बंद झाले असते. ते फक्त प्रचारासाठी हिंदुत्व बोलतात. दोन चार दिवसात‌ पक्षाचा‌ जाहीरनामा येईल.

जर सत्ता आली तर मशीदीचे भोंगे बंद करु. रस्ता अडवून नमाज पढणे बंद करु. धर्म घराच्या चार भिंतीच्या आड पाहिजे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply