Mumbai : अल्पवयीन मुलाच्या ‘ट्वीट’मुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा; मित्राला गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटा संदेश केल्याचे उघड

Mumbai : एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी त्याच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश केल्याचे समोर आले आहे. हा मुलगा छत्तीसगडमधील असून त्याला पालकांसह सहार पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ‘६ ई १२७५’ व ‘६ ई ५७’ ही इंडिगो कंपनीची विमाने तसेच न्यू यॉर्ककडे निघालेल्या ‘एआय ११९’ या विमानांत सहा दहशतवादी सहा किलो आरडीएक्ससह संदेश ‘एक्स’वरील ‘फैजलुद्दीन ६९’ व ‘फैजलुद्दीन २७०७७’ या खात्यांवरून इंडिगो आणि एअर इंडियाच्या एक्स खात्यावर हा संदेश पाठविण्यात आला होता. फैजलुद्दीन निब्रान नावाच्या व्यक्तीने हे संदेश पाठवल्याचे भासवण्यात आले होते. या संदेशामुळे सोमवारी विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. इंडिगोची विमाने थांबवून त्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली, तर न्यू यॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविण्यात आले.

Mumbai : मेट्रो ते विमानतळ मोफत बससेवा; प्रवाशांच्या सोयीसाठी टी२ टर्मिनल मेट्रो स्थानकविमानतळ एमएमआरसीची सेवा

याप्रकरणी सहार पोलिसांनी प्रशांत पालव यांच्या तक्रारीवरून धमकी व प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये बाधा आणल्याचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल केला होता. ‘एक्स’ (ट्विटर) कंपनीकडून या दोन खात्यांबाबत माहिती मागविण्यात आली असता ती एकाच व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपास केला असता छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलाने मित्राला अडकवण्यासाठी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने मित्राबरोबर मोबाइलचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय बंद पडल्यानंतर मित्राकडून सदर मुलाला तीन लाख रुपये येणे होते. या रागातून त्याने मित्राच्या खात्यावरून हा संदेश पाठविले असण्याची शक्यता आहे.

आणखी सात विमानांत बॉम्बची धमकी

सोमवारी मुंबई विमानतळावर झालेल्या गोंधळानंतर दुसऱ्याच दिवशी, सात विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे संदेश ‘एक्स’ खात्यावरून पाठविण्यात आले. जयपूर-अयोध्या-बंगळूरु (एअर इंडिया एक्स्प्रेस), डेहराडून-मुंबई (स्पाईसजेट), बागडोगरा-बंगळूरु (अकासा एअर), दिल्ली-शिकागो (एअर इंडिया), दम्मान (सौदी)-लखनऊ (इंडिगो), अमृतसर-डेहराडून-दिल्ली (अलायन्स एअर) आणि मदुराई-सिंगापूर (एअर इंडिया एक्स्प्रेस) या विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्यानंतर विविध विमानतळांवर दहशतवादविरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply