Mumbai Crime: तक्रार करायला गेला अन् परत आलाच नाही, तरुणासोबत पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं?

 Mumbai : मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तक्रार करायला गेला आणि तो परत घरीच आला नाही. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यायला गेलेला २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दीपक जाधव (वय २८ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक केटरिंग कामासाठी मुलं आणि मुलींचा पुरवठा करत होता. काम करणाऱ्या मुला-मुलींना वेळेत पगार न मिळाल्यामुळे दीपक आणि त्यांच्यामध्ये वाद झाला होता.

Ratan Tata : रतन टाटा यांना भारतरत्न द्या, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

दीपक पोलिस ठाण्यात गेला पण तो परत आलाच नाही. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे दीपक जाधवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे. रात्री उशिरा नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दीपकच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दीपकसोबत नेमकं काय घडलं याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण या घटनेमुळे जोगेश्वरीमध्ये खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply