Mumbai : हौसेला मोल नाही! २ वर्षाच्या मुलाच्या वाढदिवशी तब्बल २२१ किलोंचा 'कारचा' बर्थडे केक, वसईतील सोहळ्याची राज्यभर चर्चा

मुंबई : हौसेला मोल नसतं,हेच खरं! अशीच एक गोष्ट वसईमधून समोर आली आहे. वसईत हौशी पालकांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलासाठी भलामोठा केक आणला आहे. हा केक दोन चार नव्हे तर तब्बल २२१ किलो वजनाचा आहे.

वसईतल्या कामण इथल्या डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या नवीन आणि शुभांगी भोईर यांनी आपला मुलगा रियांश याच्या वाढदिवसानिमित्त हा केक आणला आहे. रियांश सध्या दोन वर्षांचा आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर रियांशचा जन्म झाला. तसंच जन्मानंतर जवळपास एक महिनाभर तो एनआयसीयूमध्ये उपचार घेत होता. त्यामुळे या दाम्पत्याने रियांशला लाडाकोडात वाढवलं आहे.

Follow us -

मॉन्जिनीज या कंपनीने हा भव्यदिव्य केक बनवला आहे. रियांश आमच्यासाठी देवाचं गिफ्ट आहे. म्हणूनच आम्ही त्याच्या वाढदिवसाला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया रियांशचे वडील नवीन भोईर यांनी दिली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply