Mulshi Dam Water Level : मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; ५ टक्‍के असलेला साठा झाला ४० टक्‍के

Mulshi Dam Level Update : मुळशी धरण परिसरात गेल्‍या तीन दिवसांपासून पावसाने पुन्‍हा जोर धरला आहे. पावसाच्‍या जोरदार सरी कोसळत आहेत. सतत सुरु असलेल्‍या जोरदार पावसामुळे मुळशी धरणाच्‍या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

ताम्हिणी येथे गेल्‍या चोवीस तासांत ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणात जूनच्या अखेरीस जेमतेम ५ टक्‍के असलेला साठा सुमारे ४० टक्‍के झाला आहे. मुळशी धरणातील उपयुक्‍त पाणी साठा अत्‍यंत कमी झाला होता.

पाऊस पडत होता, परंतु जोर नव्‍हता. दावडी, ताम्हिणी, पिंपरी, आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, नांदिवली, शेडाणी, मुळशी, वळणे परिसरात जोरदार पाऊस झाला. गेल्‍या तीन-चार दिवसांपासून पावसाने जोर धरल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. डोंगरांवरून येणाऱ्या पाण्‍याने ओढे, नाले,

Bhayandar Building Collapse: मीरा भाईंदरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

धबधबे प्रवाहित होऊन वाहण्‍यास सुरवात झाली आहे. त्‍यांनतर पाणीसाठ्यात वाढ होऊन साठा वाढला आहे. मागील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडत आहे. भातशेतीसाठी अत्‍यंत गरजेचा असलेला पाणी साचेल असा पाऊस होत असल्‍याने शेतकऱ्यांमध्‍ये समाधानाचे वातावरण आहे.

मुळशी धरण परिसरात शनिवारी सकाळी नोंदलेला गेल्‍या चोवीस तासांतील पाऊस मिलीमीटरमध्‍ये (कंसात या हंगामातील एकूण पाऊस) पुढीलप्रमाणे- ताम्हिणी ३५० (२७३३), दावडी ३२० (२७०६), आंबवणे २८० (२४४०), शिरगाव २३० (२३१४ ), मुळशी ८५ (१११२ ), माले ८२ (१०२८ ).



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply