Mukhtar Ansari Died : 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये मुख्तार अन्सारी म्हणाला 'जय श्रीराम' अन् झालं हत्याकांड...

Mukhtar Ansari Death News : गँगस्टर मुख्तार अन्सारीचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो बांदा जेलमध्ये होता. तिथे प्रकृती बघिडल्यामुळे त्याला राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजला नेण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यानच हार्ट अटॅक आल्यामुळे मुख्तारने श्वास सोडला.

पाच वेळा आमदार असलेल्या मुख्तारची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो 'जय श्रीराम'चा नारा देत असल्याचं ऐकायला येतंय. नेमका ही ऑडिओ क्लिप कधीची आहे आणि माफिया डॉन अन्सारी घोषणा का देतोय, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

काय आहे ऑडोओ क्लिपमध्ये?

जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ती मुख्तार अन्सारीचा शूटर अभय सिंह याच्यासोबतची बातचित आहे. हा संवाद तेव्हाचा आहे जेव्हा २००५ मध्ये भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात लोकांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता.

उत्तर प्रदेश एसटीएफच्या एका जवानाने ऑडिओ सीबीआयकडे पाठवला होता. कारण त्यावेळी कृष्णानंद राय हत्याकांड प्रकरणाची चौकशी सुरु होती.

Daund Breaking News : विषारी वायूमुळे एकाचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ; दौंडमधील घटना

ऑडिओ क्लिपमधील संवाद

  • अभय सिंहः अभय सिंह बोलत आहे

  • मुख्तार अन्सारीः हां बोल

  • अभय सिंहः रिजवान भाईंसोबत तिथे बोलणी झाली होती. जेव्हा तिथे सगळे नमाज पढण्यासाठी आले होते. त्यावेळी जरा परिस्थिती बघिडली होती.

  • मुख्तार अन्सारीः हो त्याने बदमाशी केली, ते सगळं जाऊ दे आता. आत्ता कळलंय की, हल्ला होतोय.. गोळ्या चालत आहेत. मुन्ना बजरंगी आणि कृष्णानंद राय यांच्यात.

  • अभय सिंहः अच्छा, कुठे?

  • मुख्तार अन्सारीः कृष्णानंद रायच्या गावात. दोन्ही बाजूंनी मुकाबला सुरुच आहे.

  • अभय सिंहः दोन्ही बाजूंनी गोळीबार झाली की एकाच बाजूने?

  • मुख्तार अन्सारीः जय श्रीराम

  • अभय सिंहः ठिकय भैय्या.. ठेवतो मी!

    जेव्हा ही बातचित झाली तेव्हा मुख्तार अन्सारी गाझीपूरच्या जेलमध्ये होता आणि त्याचा शूटर अभय सिंह फैजाबादच्या जेलमध्ये बंद होता. 2005 मध्ये कृष्णानंद राय यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

    हल्लेखोरांनी ५०० पेक्षा जास्त गोळ्या चालवल्या होत्या. सांगितलं जातं की, कृष्णानंदच्या मृतदेहातून ६७ गोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. या हल्ल्यात मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफझल अन्सारी आणि मुन्ना बजरंगी या गुंडांना आरोपी ठरवण्यात आलेलं होतं. परंतु सबळ पुराव्याअभावी सीबीआयच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींची मुक्तता केली. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply