MPSC Students Protest : अखेर १८ तासांनंर आंदोलन स्थगित; CM शिंदेंची घेणार भेट

MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काल दिवसभर आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन १८ तासांनंतर अखेर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं आश्वासन मिळाल्यावर स्थगित करण्यात आलं आहे.

नव्या वर्णनात्मक परिक्षा पद्धतीबद्दल MPSC चे विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यासाठी त्यांनी राज्यभरात आंदोलन छेडलं होतं. पुण्यात अलका टॉकिज चौकात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमा झाले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीचं आश्वासन दिल्यानंतर पुण्यातलं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. १८ तासानंतर पुण्यातलं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, MPSC च्या ५ विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
या आंदोलनासाठी जवळपास ४०० पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. जोवर मुख्यमंत्री शिंदेंकडून आश्वासन येत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply