MPSC Result : दुपारी मुलाखत, संध्याकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; विनायक पाटील राज्यातून प्रथम

MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ही तातुपरत्या स्वरुपाची यादी आहे. कागदपत्रे पडताळणीनंतर याचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत विनायक पाटील हा राज्यातून पहिला आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेसाठी ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची आज गुरुवारी दुपारच्या वेळेस मुलाखती झाल्या. त्यानंतर आजच सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली .

Bus Accident : बस- ट्रॅक्टरचा अपघात; चालकाचा मृत्यू, प्रवाशी जखमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत विनायक पाटील याने मुलांमध्ये प्रथक क्रमांक पटकावला आहे. तर पूजा वंजारीने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

एमपीएसी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि लांबत जाणाऱ्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यानंतर आज गुरुवारी मुलाखतीच्या अवघ्या काही तासांतच निकाल जाहीर करून उमेदवारांना सुखद धक्का दिला आहे.

तत्पूर्वी, एमपीएससी मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.

उमेदवारांच्या मुलाखती संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरिता ६२३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply