MPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक; पुण्यात उद्या राज्यव्यापी आंदोलन

पुणेः राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ती मागणी नुकतीच मान्य झाली आहे. मात्र पुन्हा पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार असल्याची माहिती असून त्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतोय.

पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये उद्या हे विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. सरकार जाणून-बुजून आम्हाला त्रास देत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि सरकारला दिला आहे.

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.

  • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

  • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

  • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply