MP Wall Collapse : मातीचं शिवलिंग बनवत होते अचानक भयंकर घडलं, भिंत कोसळून ९ चिमुकल्यांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना!

MP Wall Collapse : मध्यप्रदेशमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये मातीची भिंत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भगवत कथेचे आयोजन सुरू आहे. श्रावण महिन्यात सकाळपासूनच याठिकाणी शिवलिंगांची निर्मिती केली जात आहे. रविवारीही शिवलिंग बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली. मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलेही मोठ्या संख्येने आली होती. सकाळी शिवलिंग बनवत असताना मंदिर परिसराला लागून असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत कोसळली.

Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, २ उमेदवार जाहीर, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराविरोधात नांदगावकर मैदानात!

ही भिंत थेट शिवलिंग बनवणाऱ्या मुलांवर पडल्याने 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिस व नगर परिषदेला माहिती देण्यात आली. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अजूनही बचावकार्य सुरू आहे. माहिती मिळताच राहलीचे आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गवही घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आपल्या 'X' अकाऊंटवर ट्विट करताना त्यांनी लिहिले की, "आज सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे अतिवृष्टीमुळे एका जुनी घराची भिंत कोसळून 9 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दुःख झाले. जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मृत बालकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply