Morocco Earthquake : मोरोक्कोत मृत्यूचे तांडव! भयंकर भूकंपात २००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू; देशभरात हाहाकार

Morocco Earthquake : आफ्रिकन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्कोमध्ये मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात शेकडो घरे कोसळली असून आतापर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विनाशकारी भूकंपाने देशात हाहाकार उडाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोरोक्को देशात सर्वात शक्तिशाली विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला आहे मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

या शक्तिशाली भूकंपाने आत्तापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 2,000 नागरिक जखमी झाले आहेत, जखमींपैकी 1,404 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. इमारतींखाली तसेच मलब्याखाली अद्यापही अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात असून सध्या बचावकार्य सुरू आहे.

Ajit Pawar Speech : काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

तीन दिवसांचा दुखवटा जाहीर...

या विनाशकारी भूकंपानंतर देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भूकंपग्रस्त भागात शुद्ध पिण्याचे पाणी, अन्न पुरवठा, तंबू आणि ब्लँकेट पुरवण्यासाठी सशस्त्र दल बचाव पथके तैनात करण्यात येतील.. अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.

PM मोदींनीही केला शोक व्यक्त....

दरम्यान, या दुर्देवी घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. "मोरक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी, माझे विचार मोरक्कोच्या लोकांसोबत आहेत, या कठीण काळात भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply