Monsoon Updates : राज्यात उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, आज मात्र महाराष्ट्राला हवामान खात्याचा अलर्ट

Monsoon Updates : राज्यात पुणे, मुंबई, सोलापूरसह इतर शहरात मान्सून दाखल झालाय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय. हवामान विभागानं शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिलीय. राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर उद्यापासून कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागांचे हवामान तज्ञ एस.डी.सानप यांनी दिलीय.

राज्याचा विचार केला तर कोकण परिसरात आज चांगला पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं असून येणाऱ्या चार ते पाच दिवस राहील. आज पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेज अलर्ट देण्यात आलाय. कोल्हापूर येथील घाट माथ्यावर देखील रेड अलर्ट देण्यात आलाय. पुणे मुंबई येथे देखील आज ऑरेंज अलर्ट आहे.

सध्या जे काही आज आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे, त्याची तीव्रता उद्यापासून कमी होणार आहे. हळूहळू राज्यात देखील पावसाचा प्रमाण कमी होणार असल्याची माहिती सानप दिलीय.

राज्यात या मुसळधार पावसामुळे जवळपास ३४ हजार हेक्टर असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीच संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू, नये तसेच जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथे वाफसा तयार झाल्यास पेरणी करावी. कृषी विभागाकडून ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचा पालन शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहन देखील यावेळी हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलंय.

पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये उद्या नागपुरातही मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे.. दरम्यान बंगालमध्ये सायकॉलॉजी सर्कुलर बनल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. या आठवड्यात एलो अलर्ट असेल. वे ऑफ बंगालमध्ये एक सिस्टम तयार झाल्यामुळे पाऊस येणार असल्याचं माहिती सानप यांनी दिलीय.

सामन्याचा 10 ते 15 जूनच्या सुमारास पूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होत असतो. यावेळी केरळ असो, कर्नाटक, मुंबई महाराष्ट्राच्या काही भागात सामान्य तारखेच्या पहिले मान्सून पोहोचला आहे. बदल्या हवामानाचा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. ज्या पद्धतीने सिस्टम तयार होईल, त्यानुसार मान्सून हा थोडा लवकर असू शकतो. मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाल्यास तसे घोषित केले जाईल.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply