Monsoon Update : पुण्यात अवकाळी पावसाच्या सुखद सरी, आणखी 'इतके' दिवस पाऊस पडणार; नागरिकांना दिलासा

Monsoon Update : मे महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता मे महिन्याच्या मध्यावर पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. या महिन्यात १८३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, शहरात मागील १८ दिवसांत ६०.७ मिमी पाऊस पडला असल्याची माहिती समोर आली आहे. जे सरासरी ११.४ मिमीच्या तुलनेत तब्बल तीनपटाहून अधिक आहे.

रविवारी (१८ मे) ला एकूण १४ अतिवृष्टी झाली असून, ज्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. तसेच शिवाजीनगर भागात ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठ्या पावसाची नोंद आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांत उन्हाच्या झळा लोकांना बसत होत्या. उन्हामुळे शरीराची लाहीलाही झाली होती.

Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार

मात्र, मे महिन्यातच मान्सूनने जणू आगमनच केले आहे. प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या मान्सूनपूर्व पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या १३४% पावसाची नोंद झाली असून, एकूण १४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply