Modi Ki Guarantee : वर पृथ्वीराज चव्हाण भडकले, इंडिया आघाडी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार

Modi Ki Guarantee : सातारा शहरात  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीस महाविकास आघाडीतील  आणि घटक पक्षातील सर्व नेते उपस्थित होते. बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातींबाबत टीका केली. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र मोदी एक उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार आहोत. त्यानंतर कारवाई होईल का नाही हे माहित नाही अशी खंत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी बाेलून दाखविली. 

पृथ्वीराज चव्हाण पुढे बाेलताना म्हणाले निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही. आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा. रशिया चीनमध्ये जशी घटना बदलली गेली आता तसेच काम आपल्या भारत देशात सुरु झाल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

Lonavala Crime News : वेताळबाबा टेकडीवर पाेलिसांचा छापा, जुगार खेळणा-या नऊ जणांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

संविधान वाचवण्याचे गरज : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्य आहे या ठिकाणी पक्षांना फोडायचं आणि विरोधी पक्षात काही दम राहिला नाही असं सांगायचं काम सत्ताधारी करत आहेत मात्र जनतेला आमचे आवाहन आहे. आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा भारताच्या जनतेला आणि भावी पिढीला देऊ नका. ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याचे गरज आहे. आमच्या अपयशाची शिक्षा भावी पिढीला देऊ नका असेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply