Mobile Phone Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; घराला आग लागून ४ मुलांचा मृत्यू, पती-पत्नी गंभीर

Mobile Phone Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे घराला भीषण आग लागली. या आगीत ४ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर आई-वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता कॉलनीत शनिवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. 

सारिका (वय १०), निहारिका (वय ८), गोलू (वय ६) आणि कल्लू (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर जॉनी (वय ४१) आणि बबिता (३७) अशी गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

Shocking News : इसिसमध्ये सहभागी होण्याच्या संशयावरून आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक; काळा झेंडा आणि ईमेलचा तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिखेडा येथे राहणारा जॉनी हा मजूर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी जॉनी हा आपल्या कुटुंबासहित कामानिमित्त मेरठ शहरात आला होता. मोदीपुरम येथील जनता कॉलनीत तो भाड्याच्या घरात राहत होता.

शनिवारी (ता २३) सायंकाळी जॉनी आणि त्याची पत्नी घरकामात व्यस्त होते. त्याचवेळी मुले समोरील खोलीत खेळत होती. दरम्यान, जॉनी याने आपला मोबाइल फोन मुलांना चार्जिंगला लावण्यास सांगितला. मोबाइल चॉर्जिंगला लावताच अचानक भीषण स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता स्वयंपाक घरातून खोलीकडे धाव घेतली. या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली होती. दोघांनीही जळालेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले. मात्र, मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनीही गंभीररित्या भाजले.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जॉनी आणि त्याच्या कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना चारही मुलांचा मृत्यू झाला. सध्या जॉनी आणि बबितावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply