MNS on Marathi Patya : मुंबईत मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दोन दिवसात मराठी फलक लावा अन्यथा खळखट्याक करण्याचा इशारा

MNS on Marathi Patya : दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील नाम फलक लावण्याकारिता उच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नामफलकासाठी मनसे आक्रमक झाली आहे.

Heavy Rain In Nashik, Maharashtra : नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदार आणि व्यावसायिकांना दुकानाच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात मराठी भाषेतील फलक लावण्याचं आवाहन केलं आहे. काही दुकानदारांना मराठी भाषेतील नाम फलक असलेले बॅनर देखील देण्यात आले.

जर दोन दिवसात दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाहीत, तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशारा देखील यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *