Toll Naka: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेची 'टोल'धाड; टोल न भरताच सोडली वाहने, मनसैनिकांची धरपकड

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. संपूर्ण नवी मुंबईत मनसैनिकांनी आंदोलनाला सुरूवात केलीये. ऐरोली, ठाणे आणि पनवेल शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या 'टोल'धाडीनंतर अनेक ठिकाणी टोल न भरता वाहने सोडण्यात आलीत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज मनसे नेत्यांनी आंदोलनास सुरूवात केलीये. ठाण्यात अविनाश जाधव देखील रस्त्यावर उतरले. वाहने टोल फ्री सोडत असताना पोलिसांत आणि त्याच्यात थोडी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलंय.

Raj Thackeray News : टोल महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा; राज ठाकरेंकडून राज्यकर्त्यांच्या वक्तव्यांची व्हिडिओद्वारे 'टोल'खोल

ऐरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. येथे चारचाकी वाहनांना टोल न घेता सोडलं. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शेडुंग टोलनाका येथे देखील मनसेकडून पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी टोलनाक्यावर वाहने टोल न घेता सोडलीत. चिले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुणे ते कोल्हापुर एकूण टोल

1) खेड शिवापूर - 105 रु

2) अनेवाडी सातारा - 75 रु

3) तासवडे - 75 रु

4) किनी टोल - 75 रु



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply