MNS Meeting : मनसे महायुतीसोबत जाणार का?, पक्षाच्या लोकसभा आढावा बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

MNS Meeting : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत जाण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीसोबत जाण्याबाबत चर्चा झाली असल्याचा अंदाज आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

युती एक विचारधारा असलेल्या पक्षांसोबत होत असते

कुणाच्या व्यासपीठावर जाणं म्हणजे युती होत नाही. पेपरमध्ये बोलून युती होत नाही. आम्ही अद्याप याबाबत निर्णयापर्यंत आलेलो नाही. युती एक विचारधारा असलेल्या पक्षांसोबत होत असते. विचार भावना कार्यकर्त्यांची मते जुळावी लागतात, महायुतीसोबत जाण्याबाबतच्या चर्चेवर अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kolhapur News : बंद करा कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

याआधी २० तारखेला देखील आढावा बैठक झाली होती. आम्ही २१-२२ जागांचा पूर्ण आढावा घेतला आहे. पदाधिकारी संघटक समन्वयक जिल्हाध्यक्ष सगळे बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीसाठी पुढच्या वाटचालीची वस्तुस्थिती बैठकीत जाणून घेतली गेली, अशी माहिती नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलीये.

 

आजच्या बैठकीत जवळपास महत्त्वाच्या सर्व मतदार संघाचा आढावा घेतला गेलाय. सगळ्याच मतदारसंघासंदर्भात विचार होऊ शकतो. मात्र अद्याप निवडणुकीचे वातावरण दिसत नाहीये. लोक देखील संभ्रमात आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणालेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply