MLC Election Result : भाजप की मविआ? नाशिक, अमारवती, औरंगाबाग, नागपूर व कोकण या जागेवरून ठरणार वरचढ कोण; आज शिक्षक-पदवीधरचा निकाल

MLC Election Results 2023 : आज राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंगाच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यात नाशिक व अमारवती विभाग पदविधर तर औरंगाबाग नागपूर व कोकण या विभागात शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकांचा निकाल लागणार आहे.

सगळ्या राज्याच्या नजरा या निकलाकडे लागल्या आहेत. दरम्यान मविआ आणि भाजप यांच्याकडून विजयाचा दावा केला जात आहे. मात्र आज दुपारपर्यंत या निवडणुकीत बाजी मारणार याचं चित्र स्पष्ट होईल.

या निवडणूकीदरम्यान सर्वात चर्चेत राहीलेली जागा म्हणजे नाशिक पदविधर. येथे काँग्रेस पक्षाच्या विरोधात जात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. आता त्यांची लढत ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्याच मुख्य लढत असणार आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमिवर आता येथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निकालाआधीच पुण्यात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर देखील लागले आहेत त्यामुळे या निकालाबद्दल उत्सुकता आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून धीरज लिंगाडे हे रिंगणात आहेत, भाजपने पुन्हा डॉ.रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.या लढतीत रणजित पाटील यांच्या रुपाने भाजपआणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विक्रम वसंतराव काळे तर भाजपकडून किरण नारायणराव पाटील हे आमने सामने आहेत. यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून कालीदाल शामराव माने रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीत विक्रम काळे यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात मविआ आणि भाजप अशी थेट लढत आहे. मविआचे बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढवत आहेत.

तर नागपूर शिक्षक मतदारसंधघात निवडणुकीच्या रिंगणात भाजपने समर्थन दिलेले उमेदवार नागो गाणार तसेच विदर्भ माध्यमिक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्या प्रमुख लढत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply