Mla disqualification Case Update : शिवसेना MLA अपात्रता निकालावर राहुल नार्वेकर यांना हायकोर्टाची नोटीस, सुनावणीत काय झालं?

Mla disqualification Case Update : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडलीच. उच्च न्यायालयाने याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसह शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फरदोश पुनीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता पुढची सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. 

Lok Sabha Election : भाजपचा प्लान ठरला!लोकसभा निवडणुकीत 'विधानसभा' फॉर्म्युला

विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही यावरुन उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट जर खरी शिवसेना आहे तर व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या ठाकरे गटाच्या १४ आमदारांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला.त्यामुळे ठाकरे गटाच्या १४ आमदारांचं निलंबन करण्याची मागणी गोगावले यांनी आपल्या याचिकेतून केली आहे.

ठाकरे गटाचे १४ आमदार कोण?

भरद गोगावले यांनी उदयसिंग राजपूत, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, राजन साळवी, प्रकाश फातर्पेकर, कैलास पाटील, सुनील राऊत, विनायक चौधरी, नितीन देशमुख, सुनील प्रभू, वैभव नाईक, संजय पोतनिस आणि रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply