Mla Disqualification Case : शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर; कोर्टाने दिली नवी तारीख

Mla Disqualification Case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, या प्रकरणाची सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची गेल्या महिनाभरातील ही चौथी वेळ आहे. याआधी तीनवेळा या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. १६ आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. मात्र, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

NCP Crisis : शरद पवार की अजितदादा, खरी राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. कोर्टाने यावर सुनावणी घेत १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं.

मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं होतं. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं.

मग ६ ऑक्टोबर, त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्याचं ठरलं होतं. मात्र, आता ९ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या तारखेला तरी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार, की पुन्हा नवी तारीख मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply