Mira Road : सोसायटीत बकरा घेऊन आल्याने गोंधळ; रहिवाशांकडून हनुमान चालीसाचं पठण अन्

Mira Road : मुंबई शहराजवळील मीरा रोडमध्ये खळबळ उडवणारी घटना घडली आहे. मीरा रोड येथील एका सोसायटीत एका व्यक्तीने बकरा आणल्याने मोठा गोंधळ उडाला. सोसायटीत बकरा आणल्याने सुरक्षारक्षक आणि सोसायटीतील रहिवाशांनी विरोध केला. या घटनेने सोसायटीत एकच गोंधळ उडाला. यावेळी काही रहिवाशांनी खाली उतरून विरोधात हनुमान चालीसाचं देखील पठण केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये मोहसीन शेख नामक व्यक्ती बकरा घेऊन जात होता. त्यावेळी सोसयटीतील सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांनी विरोध केला. बकरा घरी घेऊन जाण्यास सोसायटीतील रहिवाशांचा विरोध होता.

विरोध केल्यानंतर सोसायटीतील सर्व रहिवाशांनी खाली उतरून हनुमान चालीसाचं पठण केलं. त्यामुळे सामाजिक वाद निर्माण झाला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Kolhapur : प्राध्यापिकेकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण ‌करणारं वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

काशिमिरा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने वाद चिघळला. संबंधित व्यक्ती मोहसीन शेख हा आमदार प्रकाश सुर्वे यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. तीन तासापासून नागरिकांचा उद्रेक झाला आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले.

सोसायटीतील नागरिकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर हनुमान चालीसाचं पठण केल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर घटनास्थळी दोन डीसीपी, एक एसीपी, स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
दरम्यान, जेपी इन्फॉर्ममधील रहिवाशांशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर देखील समाधान न झाल्याने संबंधित व्यक्तीने बकरा बाहेर काढण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.त्यामुळे दोन डीसीपी एसीपी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये कोणताही निष्कर्ष न निघाल्याने वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी सध्या शांतता

मीरा रोडमधील या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण झालं होतं. बकरा आणल्याने सोसायटीत गोंधळ झाला. रहिवाशांनी बकरा आणणाऱ्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. रहिवाशांनी व्यक्तीला विरोध म्हणून हनुमान चालीसाचं पठण केलं. तणाव वाढू नये, यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्यात प्रयत्न केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply