Mira Road Killing Case : सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरण, आरोपी मनोज सानेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Thane : मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आज आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. आरोपी मनोज आणि सरस्वती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मनोजने तिची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन व्हिलेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.

मिरारोडच्या नयानगरमध्ये ही घटना घडली होती. मनोज साने आणि सरस्वती वैद्य या ठिकाणच्या गीता आकाशदीप या इमारतीमध्ये राहत होते. मनोजने सरस्वतीची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ट्री कटर मशीनच्या सहाय्याने तुकडे तुकडे केले. ते त्याने मिक्सरमध्ये टाकून बारीक केले तर काही प्रेशर कूकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले. मनोजच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्यांनी तक्रार केली त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली होती.

नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सरस्वतीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीने सरस्वतीच्या हत्येची कबुली दिली. पोलीस अटक करतील या भीतीने त्याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे चौकशीत सांगितले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांना आरोपी मनोज सानेच्या घरातील बेडरुम आणि स्वयंपाक घरामध्ये बादल्या, टब, कुकर आणि इतर भांड्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे दिसले होते.हे पाहून पोलिसांनाही हादरा बसला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत हे एकून पोलिसही चक्रावले. सुरुवातीला त्याने सरस्वतीने आत्महत्या केली असल्याचे सांगितले होते. पोलिसांच्या भीतीने त्याने तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. मनोजने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे देखील सांगितले होते. पण सरस्वती ही मनोजला मामा बोलत असल्याचे देखील समोर आले होते. ऐवढेच नाही तर आरोपीने पोलिसांना सरस्वती माझ्या मुलीसारखी होती आम्ही कधीच शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे सांगितले होते.

त्यानंतर मनोज सानेने पोलिसांना हे देखील सांगितले होते की, सरस्वती आणि त्याने लग्न केले होते. सरस्वती त्याची पत्नी होती. तर सरस्वती त्याला आपला मामा असल्याचे सांगायची. मनोजने बोरीवलीच्या एका स्टोअरमधून विषारी औषध खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. तसंच तो टी-कटर मशीन खराब झाल्यामुळे दुकानात दुरुस्तीसाठी घेऊन गेला होता अशी माहिती देखील समोर आली होती. या घटनेचा नयानगर पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply