Mira Road firing : महाराष्ट्रात चाललंय काय? मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

Mira Road firing : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. आज सकाळी नवी मुंबईच्या सानपाडा येथील गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईतील मिरारोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मिरारोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मिरारोडच्या स्टेशन बाहेर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिरा रोडच्या नया नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मिरारोड स्टेशन बाहेरील शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार झाला आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला आहे. गोळीबार करणारा फरार झाला आहे. डोक्यात गोळी लागल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

Pune Accident: पॉलिक्लिनिकमधून थेरपी करुन बाहेर निघाले, भरधाव कारची बाईकला धडक; भीषण अपघातात दीर-वहिनीचा करुण अंत

या घटनेनंतर एका व्यक्तीने मोठा दावा केला की, युसूफ नावाच्या व्यक्तीवर अनेक एफआयआर दाखल झालेल्या आहेत. तरी त्याच्यावर कारवाई झालेली नाही. तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. त्याची तडीपारची नोटीस रद्द झाली. माझ्या गरोदर मुलीला मारहाण केली. तेव्हापासून एफआयआर दाखल झाल्या आहेत. या तक्रारीत मृत व्यक्ती साक्षीदार होता. त्याचा जिवाला धोका होता. त्याला धमकी मिळाली होती. हे शूटर उत्तर प्रदेशातून आल्याचं बोललं जात आहे. त्याला धमकी दिल्या होत्या. यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्यास सांगितलं होतं'.

दरम्यान, नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोघांनी पाच ते सहा राऊंड गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. भर दिवसा हा गोळीबार सानपाडा स्टेशनजवळील डी मार्ट परिसरात घडला आहे. सानपाडामधील या गोळीबाराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply