Mira Bhayandar : खाडीत जोडप्याने मारली उडी, नवरा वाचला; बायको बेपत्ता

Mira Bhayandar : मीरा भाईंदरमधील वरसावे खाडीत एका महिलेनी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला वाचवण्यासाठी तिच्या पतीने देखील खाडीमध्ये उडी मारली. पत्नी बुडाली असून तिच्या पतीला वाचवण्यात यश आले असून त्याला बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती वादातून या महिलेने खाडीमध्ये उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहमदाबादवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ब्रिजवरून वरसावे खाडीत एका जोडप्याने उडी मारली. शशिकला यादव (२८ वर्षे) आणि दिनेश यादव (३२ वर्षे) असं या पती-पत्नींची नावं आहे. शशिकला यादव आणि दिनेश यादव हे दोघे नायगाववरून या ब्रिजवर पोहोचले. अचानक या महिलेने वरसावे खाडीमध्ये उडी मारली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती दिनेश यादव यांनी देखील उडी मारली.

Pune CCTV : धक्कादायक! पुण्यात १ हजार सीसीटीव्ही बंद, नागरिकांच्या सुरक्षेचं काय?

महामार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी मिरा-भाईंदर अग्निशामक दल, काशिगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. स्पीड बोटच्या सहाय्याने दिनेश यादव याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र महिलेला पोहता येत नसल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे ती खाडीमध्ये बुडाली.

अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलेचा शोध सुरू असल्याची माहिती काशिगाव पोलिसांनी दिली. हे पती-पत्नी नायगावमध्ये राहणारे असून घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास काशिगाव पोलिस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *