Minority Development Department Maharashtra: अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्याचदिवशी त्यांच्या अखत्यारीत येणार्या अल्पसंख्याक विभागाने घाईघाईत 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिला. 2 फेब्रुवारीपर्यंत हा प्रकार झाला. ही बाब समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चौकशी करून कडक कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान याप्रकरणी स्वाक्षरी केलेले उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर आता या सर्व घडामोडीत अल्पसंख्यांक विभागानं बाजू मांडली आहे.
काय आहे प्रकरण?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अल्पसंख्याक विभागाने केवळ चार दिवसात 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिला. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी याप्रकरणी मोठा आरोप केला. त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली. पैशासाठी हापलेले संधीसाधू अधिकारी आणि दोषींना मकोका लावून त्यांची थेट कारागृहात रवानगीची मागणी त्यांनी केली.
या 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेत 25 टक्के राखीव जागा तसेच शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य नसते. यामुळे मोठा आर्थिक लाभ मिळवता येतो. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून हे प्रमाणपत्र वाटप रोखून धरलेले असताना एकाच वेळी इतक्या प्रमाणात हे प्रमाणपत्र वाटप झाल्याने अर्थपूर्ण व्यवहाराचा संशय बळावला. आता याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.
दोन दिवसात चौकशीला सुरुवात
अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोक पाळला जात असतानाच अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करत अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाचा धडाका लावला. या प्रमाणपत्रावर अल्पसंख्याक खात्याचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची स्वाक्षरी आहे. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर ज्या संस्थांना प्रमाणपत्र वाटप झाले. ती प्रक्रिया पण संशयाच्या भोवर्यात आहे. याप्रकरणी शेणॉय यांच्या चौकशीला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे.
ही तांत्रिक चूक
दरम्यान अल्पसंख्यांक दर्जा देणार्या अल्पसंख्यांक विभागाने याप्रकरणी सारवासारव केली आहे. ही तांत्रिक चूक असल्याचे उत्तर विभागाने दिले आहे. तर 28 जानेवारी रोजी एकही प्रमाणपत्र वाटप झाले नसल्याचा दावा अल्पसंख्यांक विभागाने केला. 29 जानेवारीपासून अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. पण अशी तांत्रिक चूक होते कशी यावर मात्र विभाग मूग गिळून आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


