Milind Deora Resign : मिलिंद देवरांचा पक्षाला 'रामराम', कॉंग्रेसच्या गोटात खळबळ; बाळासाहेब थोरात म्हणाले; 'निर्णय दुर्दैवी...'

Milind Deora Resign : आजपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होत आहे. अशातच महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ट्वीट करत या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया..

आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Bharat Jodo Yatra : १४ राज्य, ६६ दिवस, ६७१३ किमीचा प्रवास... राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात होणार

तसेच देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply