MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

MI vs KKR, IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेतील आव्हान टीकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा असलेला सामना अखेर मुंबई इंडियन्सने गमावला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गुणतालिकेत तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र मुंबईला हा सामना २४ धावांनी गमवावा लागला आहे. यासह मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

मुंबई इंडियन्स  संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून इशान किशन  आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. या दोघांनाही चांगली सुरुवात करुन देता आली नाही. अवघ्या १६ धावसंख्येवर मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का बसला.

T20 WC 2024: केएल राहुलला संघात का नाही घेतलं? रोहितने सांगितलं कारण

इशान किशन अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. तर त्यानंतर रोहित शर्माने अवघ्या ११ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नमन धीर देखील अवघ्या ११ धावा करत माघारी परतला. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना एकट्या सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३५ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.

कोलकाताने केल्या १६९ धावा...

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करतानाकोलकाता नाईट रायडर्स  संघाचा डाव अवघ्या १६९ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना वेंकटेश अय्यर चमकला. त्याने ५२ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ७० धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मनीष पांडेने ३१ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीच्या बळावर त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाची धावसंख्या १६९ धावांपर्यंत पोहचवली.

या सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग ११..

मुंबई इंडियन्स..

इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

कोलकाता नाईट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply