MHT CET परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; CET मध्ये चक्क 48 जणांना मिळाले 100 पर्सेंटाईल मार्क्स,

MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेमध्ये केवळ ४८ जणांना 100 पर्सेंटाईल मार्क्स मिळाले आहेत. तर जाणून घ्या तुमच्या विभागातील टॉपर. 

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

48 जणांना मिळाले 100 पर्सेंटाईल मार्क्स

मुंबई- शैवी विश्वास बालवटकर , शिंदे अनिमेश नागेशकुमार

कोल्हापूर- पोवार वैभवी सुहास, संगेवार तन्मयी सुनीलदत्त

पुणे- सेजल रमेश राठी, आर्या तुपे

सातारा- मोरे वैष्णवी सुरेश, श्रुतम दिपक दोशी

रायगड- देशपांडे श्रेयस अविनाश

या विद्यर्थ्यांसह अनेकज टॉपर आहेत.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती.

पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply