
पुणे - शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी आवश्यक कामगार भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये देत भुमीपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवत असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मेट्रो प्रशासन व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याची मागणी मेट्रो, पीएमआरडीए प्रशासनाकडे केली.
शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. आगामी वर्षात हे काम पुर्ण होऊन मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने मेट्रोसाठी विविध पदांवर आवश्यक कुशल मनुष्यबळ घेण्यासाठी बिहारमधील काही वृत्तत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोप मनसेने केला आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्प राबविताना त्यामध्ये भुमीपुत्रांना स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार देणार असल्याचे राज्य सरकार व मेट्रो प्रशासनाने सांगितले होते.
प्रत्यक्षात जाहिरात मात्र बिहारमध्ये प्रसिद्ध केल्याबद्दल मनसेने संताप व्यक्त केला. मंगळवारी दुपारी मनसेच्यावतीने औंध येथील 'पीएमआरडीए'च्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी मेट्रो व पीएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, नेते राजेंद्र वागसरकर, विभागाध्यक्ष विनायक कोतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनानंतर मनसेच्यावतीने अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बाबर म्हणाले, 'महाराष्ट्रातील तरुणांमध्ये गुणवत्ता, क्षमता असतानाही पुणे मेट्रो प्रशासन मेट्रो भरती बिहार राज्यातुन कशाला ? स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, असा राज्य सरकारचा आदेश असताना मेट्रो प्रशासन बिहारमधील पाटणा येथे मुलाखती घेणार आहे. तेथे जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील भुमीपुत्रांच्या विरोधी भुमिकेचा मनसे निषेध करीत आहे. या भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही. बिहारमधील नोकरभरती तातडीने थांबवावी, पुणे मेट्रो भरतीमध्ये महाराष्ट्रातील भुमीपुत्रांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. मराठी वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध करा. तसे न केल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल.'
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

