Mega Block : पश्चिम रेल्वेवर पुढील २ दिवस जम्बो मेगाब्लॉक, ३४४ लोकल सेवा रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

 

Mega Block : मुंबईकरांनो कृपया इथे लक्ष द्या. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळेस मोठा फटका बसणार आहे. माहिम ते बांद्रा स्थानकादरम्यान, पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे तब्बल ३४४ लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

ब्लॉकचा कालावधी

शुक्रवार (११ एप्रिल)

अप डाऊन धिम्या मार्गावर: रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत,

अप डाऊन जलद मार्गावर: रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत.

यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

शनिवारी (१२ एप्रिल)

अप डाऊन धिम्या मार्गावर: रात्री ११:३० ते सकाळी ९:००.

अप जलद मार्गावर: रात्री ११:३० ते सकाळी ८:००.

या काळात चर्चरगेट दादर दरम्यान, जलद लोकल धावणार आहेत.

तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

प्रमुख लोकल सेवा वेळापत्रक बदल (शनीवार- रविवार)

शनिवार शेवटची लोकल: १०:५३

रविवारी पहिल्या लोकलचे वेळापत्रक:

चर्चगेट - विरार धीमी लोकल: सकाळी ८:०८

भाईंदर - चर्चगेट लोकल: सकाळी ८:२४

विरार - चर्चगेट जलद लोकल: सकाळी ८:१८

चर्चगेट - विरार जलद लोकल: सकाळी ९:०३

प्रवाशांना आवाहन:

रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था आखणे आवश्यक आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply