Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, किती रेल्वे लोकल रद्द?

Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभाग ३० मार्च २०२५ (रविवार) रोजी उपनगरीय मार्गांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे राबविण्यासाठी मेगा ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होईल. परिणामी, काही गाड्या वळवाव्या लागतील, तर काही गाड्या रद्द केल्या जातील. प्रवाशांनी अनुकूलतेसाठी आपली प्रवास योजना पूर्वसूचना घेऊन ठरवावी, असे रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे.

तपशील खालीलप्रमाणे:

ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/सेमी जलद गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील या सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकांवर थांबतील तसेच मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी १०.३४ ते ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.१६ ते ३.४७ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द होतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेगा ब्लॉक्स आवश्यक आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांना होणाऱ्या असुविधेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत, अप आणि डाउन जलद मार्गांवर धावणाऱ्या लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. चर्चगेटला जाणाऱ्या काही गाड्या फक्त वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच धावतील. त्याचा परतीचा प्रवास त्याच स्टेशनवरून सुरू होईल. परिणामी, काही लोकल गाड्या रद्द होतील आणि काही लोकल गाड्या उशिराने धावतील.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply