Meerut News : मेरठमध्ये भीषण दुर्घटना, कोल्ड स्टोरेजची भिंत पडल्याने ५ कामगारांचा मृत्यू, काही जण अडकल्याची भीती

मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या कोल्ड स्टोरेजचा लेंटर खाली पडल्याने झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर एकूण सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी दोन जण जिवंत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला, त्या वेळी डझनहून अधिक मजूर तेथे काम करत होते, ते ढिगाऱ्यात गाडले गेले. अचानक झालेल्या अपघातामुळे खळबळ उडाली असून, त्यानंतर आता पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरु केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दौराला येथील डीपीएस शाळेजवळील कोल्ड स्टोरेजच्या लेंटरखाली काम करणारे सुमारे डझनभर मजूर त्याखाली गाडले गेले. त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. जखमी मजुरांना मेरठच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघातात निष्काळजीपणा कशामुळे झाला, याची चौकशी होणार आहे.

कोल्ड स्टोरेजच्या बांधकामाचे काम सुरू असून मजूर लेंटरवर उभे होते, मात्र अचानक लेंटर खाली पडला. त्यानंतर मोठा आवाज झाला, जे ऐकून स्थानिक लोकही घटनास्थळी पोहोचले. सर्वात आधी स्थानिकांनी मजुरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर बचावकार्य सुरू झाले.

यासाठी नगर पंचायतींकडून जेसीबीही मागवण्यात आले आहेत. सोबतच जखमींसाठी रुग्णालयात वॉर्ड तयार करण्यात आला आहे. रेस्क्यू टीम मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply