Maval : होळी सणाला गोलबोट, पोहण्याच्या मोहापायी गमावला जीव; इंद्रायणी नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू

Maval : राज्यासह देशभरात धुळवड साजरी करण्यात आली. परंतु धुरवडीला दु: खाचं गालबोट लागलंय. मावळ आणि यवतमाळमध्ये हृदय हादरवून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. मावळमधील इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर यवतमाळमध्ये दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनांमुळे परिरसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. होळीच्या सणाची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांनी आपला जीव गमावलाय. घरकुल येथील ५ तरुण इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झालाय. हे तरुण मावळमधील किन्हई गावात असलेल्या बोडके वाडी बंधारा इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला.

Fastag Mandatory : १ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; कॅश किंवा ऑनलाइन पमेंट केले तर दुप्पट टोल भरावा लागणार

मृतदेह शोधण्याचे काम वन्यजीव संरक्षक मावळ संस्था यांच्याकडून सुरू आहे. त्यातील तीन मृतदेह शोधण्यात यश आले आहे. आकाश घोर्डे वय 23, राज आगमे वय 25, आणि गौतम कांबळे वय 24, अशी मृत तरुणांची नावे आहेत. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply