Maval News : नेरेतील अवैध वृक्षतोडीवर विकासकास तब्बल आठ लाखांचा दंड

Maval News : मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली बऱ्याच वेळा वृक्षसंपदेची कत्तल केली जाते. काही वेळा वनविभागाची रीतसर परवानगी घेतली जाते. बऱ्याच प्रकरणात वनविभागाकडे असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळाचा फायदा घेऊन मालकी क्षेत्रात विनापरवानगी अवैध वृक्षतोड केली जाते. विनापरवानगी वृक्षताेड केल्याने नेरे गावातून एकाकडून तब्बल आठ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

नेरे गावात विकासकाने विनापरवानगी वृक्षतोड केली. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी तथा वृक्ष अधिकारी संतोष चव्हाण यांनी त्यास तब्बल आठ लाख रुपयांचा दंड बजावला. तो वसुलही करण्यात आला आहे.

 

Shirpur News : कारमधून गांजाची तस्करी; ५४ किलो गांजासह तिघांना अटक

वसुंधरा सामाजिक उन्नती वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन सहकारी संस्था मर्यादित यांनी एकूण चारशे वृक्ष लागवड केली होती. अवैध वृक्षतोड झाल्याबाबत तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

अतुल साठे, बाबासाहेब बुचडे यांचेसह इतर तीस ते चाळीस लोकांनी मिळून हे कृत्य केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्ष स्थळपाहणी दरम्यानसुमारे 800 -850 झाडांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पुढील चौकशीसाठी संशयित आरोपींना नोटीस बजावण्यात आली. संशियांतानी भोर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात उपस्थित राहून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांचा समक्ष जबाब नोंदवला. त्यामध्ये संशयितांनी गुन्हा कबूल करून शासकीय नियमाप्रमाणे होणारा दंड भरण्यास तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्याकडून आठ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply