Maval : मोठी बातमी! पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती

Pune : पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरल पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २० ते २५ पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात हा धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. आज रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती. या गर्दीमुळे पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Pune : हिंजवडीतील ‘जलकोंडी’ची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल; पाणी साठल्यास मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीला दंड

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणाकडून सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply