Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठा गोंधळ; शिंदे गटाकडून बोगस मतदान?

Market Committee Election : राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ठिकठिकाणी मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिंदे गटाकडून बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे.

पुणे आणि जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने मतदान थांबवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत आज मतदान पार पडत आहे. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत एका अपक्ष उमेदवाराने थेट मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply