Mard Strike : घाटी रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांची निदर्शने, 532 जण संपावर

Mard Strike :  वेतनात वाढ आणि वस्तीगृहाची दुरुस्ती यासह विविध मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील जवळपास 532 निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.

गेल्या महिन्यातील 7 फेब्रुवारीला निवासी डॉक्टरांनी संपाची हाक दिली होती. मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्यस्थी करत तुमच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं होते. त्याची पुर्तता अद्याप झालेली नाही.

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश

दाेन आठवडे उलटूनही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आजपासून (शुक्रवार) पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णांची हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर  येथील घाटी रुग्णालयातील जवळपास 532 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply