Marathwada Water Crisis : मराठवाड्याला पावसाची हुलकावणी, धरण प्रकल्प कोरडे पडले, अत्यल्प जलसाठ्यामुळे चिंता वाढली!

Marathwada Water Crisis  : राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसत असताना त्याच पावसाने मराठवाड्यात मात्र हुलकावणी दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पिकाला साजेसा असा पाऊस झाला असला तरी धरण आणि प्रकल्प कोरडे असल्यामुळे मराठवाड्याची चिंता अधिक वाढली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने पूर्ण होत आहेत. तरी मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला नाही. परिणामी, मोठ्या, मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या प्रकल्पाच्या जायकवाडी उर्ध्वभागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरविल्यामुळे जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे.

Budget 2024 : भरघोस निधी की पोकळ घोषणा? केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पुणेकरांचे लक्ष; ठोस तरतूद हवी

विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आहे. अर्धा पावसाळा उलटुन चालला तरीही मराठवाड्यातील सीना कोळेगाव,मांजरा आणि मांजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरित प्रकल्पात काही दिवसच पुरेल इतकं पाणी आहे. जवळपास ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत.

मराठवाड्यातील प्रकल्पाची आजची स्थिती

जायकवाडी ४.३

निम्न दुधना ६.४०

येलदरी ३०.८

सिद्धेश्वर ५.६६

पैनगंगा ४०

मानार २७.३६

निम्न तेरणा २५

विष्णूपुरी ७०

माजलगाव 00

मांजरा 00

सीना कोळेगाव 00

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply