Marathwada Water : 'जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडा...' राज्य सरकारचा आदेश सूत्रांची माहिती

Marathwada Water : सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत जायकवाडी धरणात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतून पाणी सोडण्याच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मराठवाड्यात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळ झाला असून जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर राज्यात चर्चा सुरू होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर हा वाद आता मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Nashik Accident News : आचाेळे उलवे फाट्यावर भीषण अपघात, अपघातात ५ जखमी

याबाबतची आता महत्वाची अपडेट समोर आली असून  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याच्या शासनस्तरावरून सूचना आल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र मराठा आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा अडसर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यास कोणताही गतिरोध नाही. सुप्रीम कोर्टाच्या आंदोलनाचे तंतोतंत पालन करणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पत्रातील सत्यता तपासणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply