Mumbai : मराठा आंदोलनाचे वादळ आता दिल्लीकडे; मनोज जरांगे महायुती सरकारची चिंता वाढवणार?

Mumbai : मराठा समाजाचं राज्यव्यापी अधिवेशन दिल्लीला होणार आहे. राज्यभरातून मराठा समाज दिल्लीत एकत्र येणार आहे. मराठ्यांचं वादळ आता मुंबईनंतर राजधानी दिल्लीला धडकणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. अजित पवारांनी पक्ष वाढवावा, मात्र असे लोक सोबत ठेवू नयेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सारथी संस्थेच्या अनेक योजना बंद केल्या, असा आरोपही जरांगेंकडून करण्यात आला.

Kanpur : पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू; महिला शिपायाशी जवळीक आणि चॅटिंगमधील संभाषणे तपासाच्या केंद्रस्थानी

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरून आरोप करत म्हटलं की, कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखली जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रमध्ये नोंदी शोधत नाहीत. प्रमाणपत्र दिले जात नाही. काही अधिकारी अडथळा करीत आहेत. सातारा, पुणे, औंध संस्थानचा जीआर तातडीने काढा'.

मुंडेंच्या घातपाताच्या सुपारीच्या आरोपावरही जरांगे यांनी भाष्य केलं. 'मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. अजित पवार यांच्या पक्षाला आता त्यांच्यामुळे उतरली कळा लागेल. नरेंद्र पाटील यांनी छगन भुजबळांचे नाव घेतले. भुजबळ यांनी सांगितल्याने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अनेक योजना बंद केल्या आहेत. मग उद्योजक कसे होतील. व्यावसायिक तरुण अडचणीत आले आहेत'.

'हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा. मला पश्चिम महाराष्ट्रातील चारही गॅझेटचा जीआर पाहिजे. शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली नाही. त्यामुळे बँका मागे लागत आहेत. जूनच्या कर्ज मुक्तीचा जीआर आजच्या अधिवेशनात काढा. कर्ज माफी होत असली, तरी आताही त्यांना कर्ज द्या. २०२९ ला महायुतीला मोठा फटका बसणार आहे. कारण घातपात करणाऱ्या लोकांना हे पाठीशी घालत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *