Maratha Reservation News : पोलिसांच्या नोटीसा, तरीही मराठा बांधव ठाम; मनोज जरांगेंसोबत ५०० ते ७०० ट्रॅक्टर मुंबईत नेणारच

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होतील असा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर मधून या दिंडीत ५०० ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या नोटीसांची पर्वा न करत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे. 

मनोज जरांगे २० जानेवारी रोजी पायी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. वाटेत त्यांच्यासोबत मराठा बांधव जोडले जाणार आहेत. छत्रपती संभाजानगर येथूनही मराठा बांधव पोलिसांनी दिलेल्या नोटिसा धुडकावून ५०० ट्रॅक्टरसह घेऊन या दिंडीत सहभागी होणार आहेत.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फेरीवाल्यांची दहशत; नागरिकांना सर्रास होतेय मारहाण

मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयक ५०० ट्रॅक्टर मुंबईला घेऊन जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यासाठी सध्या गावागावांत बैठका सुरू आहेत. मुंबईमध्ये ट्रॅक्टर नेऊ नये याबाबत ट्रॅक्टर मालकांना ठिकठिकाणी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

मात्र, यानंतरही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि समाजातील ट्रॅक्टर मालकांनी नोटिसा धुडकावून मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीत ट्रॅक्टर नेण्याचे नियोजन सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून ५०० ते ७०० ट्रॅक्टरचे नियोजन सुरू आहे, असं मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply