Maratha Reservation Kolhapur : 'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा तात्पुरती स्थगित; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींचा महत्त्वाचा निर्णय

Maratha Reservation Kolhapur : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश पदयात्रा सोमवारपासून (ता. ३०) तात्पुरती स्थगित करण्यात आली. दरम्यान, सांगली -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामातील चारशे रूपये प्रतिटन दिल्याशिवाय एक कांडेही ऊस दिला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शेट्टी म्हणाले, ‘१७ ऑक्टोबरपासून गत हंगामातील प्रतिटन चारशे रूपये द्या व वजनकाटे ऑनलाइन करा या मागणीसाठी ५२२ किमीची पदयात्रा सुरू केली आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून ही पदयात्रा सुरू होऊन सोमवारी करमाळे (ता. शिराळा) येथे आक्रोश पदयात्रा स्थगित करण्यात आली.

Chhatrapati Sambhaji Nagar : आता बघ्याची भूमिका घेऊ नका, थेट कारवाई करा; हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना सूचना

 

सुमारे ३०० किमीची पदयात्रा पूर्ण झाली आहे. समाजीत सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. जरांगे- पाटील यांचे आंदोलन तीव्र होत आहे. त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. आक्रोश पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते.

फुले- फटाके आदींने स्वागत होत असताना अशा पार्श्वभूमीवर हे स्वागत स्वीकारणे मला अप्रस्तुत वाटत होते. म्हणून ही आक्रोश पदयात्रा आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत. आमचे ऊसदराचे आंदोलन सुरुच आहे. जरांगे- पाटील यांचे उपोषण संपल्यावर आमची पदयात्रा जेथून स्थगित केली तेथूनच सुरू होईल.’

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply