Maratha Reservation : छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा; अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

Maratha Reservation :  एकीकडे राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभा आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ मराठा विरुद्धओबीसी आणि मराठा विरुद्ध नाभिक समाज अशी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील वातावरण दूषित करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी (ता. ६) एका पत्रकार परिषदेत केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी रोजी वाशीमध्ये पोहोचलेल्या मराठा आंदोलकांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे सरकार मराठा समाजाच्या बाजूने उभे राहत आहे; परंतु सरकारमधीलच एक मंत्री असलेले छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी केली.

Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात अभिजित मानकरला अटक, पोलिसांनी शोधल्या १८ हजार ऑडिओ क्लिप

कुठलाही निर्णय मंत्रिमंडळाचा सामूहिक असतो. तो एकट्या मुख्यमंत्र्यांचा नसतो. असे असताना त्याला एका मंत्र्याने जाहीर विरोध करणे योग्य नाही. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर जाट मराठा गुर्जर पाटीदार संयुक्त कृती समिती आंदोलन सुरू करेल, अशी स्पष्ट भूमिका जगताप यांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. आज दादरमधील शिवनेरी सभागृहात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत कृती समितीने आपली भूमिका जाहीर केली.

पत्रकार परिषदेला भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत, अखिल भारतीय जाट महासभेचे जनरल सेक्रेटरी युद्धविर सिंग, पाटीदार संघर्ष समितीचे मनोज पणारा, राजस्थान गुर्जर महासभेचे हिम्मतसिंग गुजर, वीर गुर्जर महासभाचे सुभाष चौधरी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजी दहातोंडे, प्रवक्ता श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply