Maratha Reservation : ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट : उदय सामंत

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा जो मसुदा तयार केला आहे त्यामूळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. ही सरकारची भूमिका आहे असे मत उद्याेग मंत्री उदय सामंत  यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. ते बीडमध्ये बोलत होते. 

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश  रद्द करा अशी मागणी सकल ओबीसी समाज  करु लागला आहे. गुरुवारी राज्यभर सकल ओबीसी समाजाने आंदाेलन करीत स्थानिक प्रशासनास अध्यादेश रद्द करण्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Uddhav Thackeray : भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली? उद्धव ठाकरेंचा सवाल; भरत गोगावलेंवर साधला निशाणा

याबाबत उद्याेग मंत्री उदय सामंत म्हणाले राजकारणाच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही वाद वाढवायचा नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही. ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, ही भूमिका सरकारची आहे.

छगन भुजबळांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा करतील

आमदार संजय गायकावड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर मंत्री सामंत म्हणाले भुजबळ हे मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या पक्षाच्या आमदारांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. ही पक्षाची भूमिका नाही. छगन भुजबळ यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करतील असे यावेळी सामंत यांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply