Maratha Reservation : मनोज जरांगेंचं मुंबईतील मराठा आंदोलन फसणार? सदावर्तेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अन्यथा येत्या २६ जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. लाखो मराठा आंदोलकांसह जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. अशातच जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे.

मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी फौजदारी रीट याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पहाटे पुण्यात दाखल, शहरातील वाहतूक व्यवस्थेत आज ‘हे’ महत्त्वाचे बदल

सदावर्तेंनी याचिकेत काय म्हटलंय?

"मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा", अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.

दरम्यान, जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी जनहित याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी हायकोर्टात केली होती. मात्र, हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते.

"मुंबईत आंदोलनाच्या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही. आम्हाला महत्त्वाची कामे आहेत. या विषयाशी संबंधित प्रशासनाकडे जा. आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही", अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलं होतं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply