Maratha Reservation : मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, CM शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक; नेमकं काय घडतंय?

Maratha Reservation : राज्य सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला. दरम्यान, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत एक आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. नुकतीच मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठक पार पडली होती.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोंनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव, अकोला JN.1 बाधित पहिला रूग्ण

मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक

त्यानंतर आज मुंबईत महत्वाची बैठक होणार असल्याने मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी या बैठकीतून आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुंबईतील मराठा समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स याची देखील मराठा समन्वयक पाहणी करणार आहे.

मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा सेवकांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मुंबईच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. सकाळी ९ वाजता शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply