Maratha Reservation : आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच; मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला काय सांगितलं?

Maratha Reservation : "माझ्याकडे 5 ते 6 दिवसांपूर्वी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यांनी मला विनंती केली, की तुम्ही छगन भुजबळ यांच्यावर बोलू नका. मी म्हटलं ठीक आहे, पण 'त्यो'का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजवलाच समजा", असं मी शिष्टमंडळाला सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी भरसभेत सांगितलं.

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आज  मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. इतकंच नाही, तर आम्ही पोलीस केसला घाबरत नसल्याचंही जरांगे म्हणाले.

Sunil Kedar News : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी

"मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल. तुम्ही छगन भुजबळ यांचं टेन्शन घेऊ नका. असा धीरही जरांगे यांनी मराठा समाजाला दिला. आरक्षणासाठी आपण सरकारला आधी ३ महिने वेळ दिला होता. त्यानंतर सरकारने पुन्हा ३० दिवसांचा वेळ मागितला. शिंदे समितीला राज्यभरात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या", अशी माहिती जरांगे यांनी दिली.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "याच नोंदी पाहून सरकारने ७० वर्षांपूर्वी आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज नंबर १ झाला असता. तुम्ही मराठ्यांना खवळू नका, नोटीसा पाठवल्यानंतरही आम्ही मुंबईत येणारच आहोत, आम्हाला मुंबईतील अभिनेत्यांना बघायचं आहे", असा टोलाही जरांगे यांनी भरसभेतून हाणला.

"दोन दिवसात सरकार मराठा आरक्षणावर मार्ग काढेल, पण तुम्ही आता माघार घेऊ नका. जातीपेक्षा नेत्यांना मोठं मानू नका. आपल्याला आपल्या लेकरांना मोठं करायचं आहे. तुमचे पाठबळ असल्यावर मी मरायलाही घाबरत नाही. फक्त तुम्ही पूर्ण ताकदीने गावागावात आंदोलन करा, एकजूट वाया जाऊ देऊ नका", असं आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply